राजमाता जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
मित्रांनो,`आदर्श हे नेहेमी स्फूर्ती देतात !' सिनेनट, क्रीडापटू, राजकारणी हे बऱ्याच जणांचे आदर्श असतात. त्याप्रमाणे आपण आचरण करतो आणि काही काळाने हे म्हणजे खरे नव्हे, असे आपल्या लक्षात येते. आपण इतिहासात डोकावल्यास अनेक आदर्श आपल्याला दिसून येतात, ज्यांनी अनेक पिढ्यांना स्फूर्ती दिली आहे आणि ते पुढेही देत रहाणार आहेत. असा हा `तेजोमय इतिहास' आज दुर्लक्षिला जात आहे. याचे पुर्नस्मरण करून देणे, हाच आमचा मूळ उद्देश आहे. यापासून स्फूर्ती घेऊन तुम्ही केवळ स्वत:पुरते न पहाता राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी केल्यास सार्थकी लागले, असे आम्ही म्हणू !
www.balsanskar.com
आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य ठरते. मुलांवर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा ! त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्राच्या उभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नच ठरतील ! हे लिखाण ह्यासाठी मार्गदर्शक ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
श्रावण महिन्यांत सुवासिनी स्त्रिया जिवतीची पूजा दर शुक्रवारी करतात. छार्पाल नागनरसोबाची चित्रे मिळतात. त्यांची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नरसोबाची पूजा, चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात