Headlines | Top 10 | Categories | Classifieds | Home
Register | Sign In | Add Link   Search
Frequently Asked Questions

How to use jaymaharashtra.com?

मित्रांनो,

आम्हाला एक गोष्ट पक्की माहित आहे. ती म्हणजे मराठी माणूस कधी गप्प बसत नसतो! जे जे चांगलं दिसेल, जे जे मनास भावेल, आवडेल, बेचैन करेल, ते ते दुस-याला स‌ांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नाही.

जयमहाराष्ट्र डॉट कॉम हा उद्योग तरी दुसरा काय आहे?

आपल्याला या वेबपसा-यात जे जे मराठी सोनं स‌ापडेल, ते ते एकमेकांना इथं वाटायचं आहे. आपल्याला आवडलेली, भावलेली माहिती जयमहाराष्ट्रच्या माध्यामातून स‌गळ्यांसमोर मांडायची आहे.

या माहितीमध्ये काय बरं असू शकेल?

त्यात बातम्या असतील आपल्या गावाकडच्या, त्यात व्यक्ती, स‌ंस्था यांची माहिती असेल, एखादा छानसा एका बैठकीत वाचावा असा लेख असेल, की चार दिवस गुणगुणावं असं झकास गाणं असेल... या माहितीच्या महाजालात असं काही स‌ापडलं रे स‌ापडलं, की त्याची लिंक आपल्याला इथं द्यायची आहे. आता प्रश्न एवढाच आहे, की ती लिंक द्यायची कशी? स‌ोप्पंय ते!   

How to add link?
पहिल्यांदा काय करायचं, तर या स‌ंकेतस्थळावर register व्हायचं. त्यासाठीची स‌ोय होमपेजवर केलेली आहेच.

रजिस्टरमध्ये तुम्ही तुमची माहिती भरली, की मग तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्त्यावर एक मेल येईल. त्यात असेल जयमहाराष्ट्र डॉट कॉमची लिंक. ती क्लिक केली, की तुम्ही झालात स‌ामील जयमहाराष्ट्र परिवारात.

आता तुम्ही तुमच्या लॉग-इन नेमने एकदा लॉग-इन झालात, की मग खुश्शाल हव्या तेवढ्या लिंक्स तुम्ही देऊ शकता. त्यासाठी add link वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर येईल एक नवे पान. त्यात -

तुम्ही टायपिंगसाठी वापरणार असलेली भाषा, ती लिंक ज्या category sub-category मध्ये जाणार तिचे नाव, लिंकचे शीर्षक, लिंकविषयीची माहिती आणि लिंकचा यूआरएल अर्थात पत्ता असे रकाने असतील. ते भरले आणि save/add link वर क्लिक केलं, की झालीच तुमची लिंक जमा जयमहाराष्ट्रच्या खजिन्यात.  

म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एका स‌ाईटवर वाचलेला लेख इथं अपलोड करायचा आहे. तर मग पहिल्यांदा ठरवायचं की तो लेख कोणत्या category मध्ये जाऊ शकतो. उदाहरणार्थ तो मुंबईविषयीचा लेख असेल, तर मग मुंबई या category तील आवडलेलं.. भावलेलं ही subcategory स‌िलेक्ट करायची. मग आपण येतो लिंकच्या शीर्षकाकडे. त्याठिकाणी त्या लेखाचा मथळा टाईप करायचा. त्याखाली लिंकचे वर्णन लिहायचे. आणि त्यानंतर मग या सगळ्यातला महत्त्वाचा भाग. लिंकचा url पेस्ट करण्याचा. url म्हणजे तुमच्या त्या लेखाचा इंटरनेटवरील पत्ता. तो व्यवस्थित दिला, तरच आपले वेबवाचक त्या लेखापर्यँत जाऊ शकतील. हा पत्ता त्या लेखाच्या स‌ाईटवरील address bar मधून कॉपी करायचा आणि आपल्या लिंक url या रकान्यात पेस्ट करायचा. मग save/add link या बटणावर क्लिक करायचं.

बस्स!    

How to write in Marathi?
मराठीत कसं लिहायचं?

जयमहाराष्ट्रने मराठीत टाईप करायचीही खास स‌ोय केलेली आहे. add link या पेजवर तुम्हाला भाषेचे दोन पर्याय दिलेले आहेत. english आणि english-marathi 

मराठीत लिहिण्यासाठी दुसरा पर्याय स‌िलेक्ट करा. आता तुम्ही थेट मराठीत लिंकचे शीर्षक आदी माहिती लिहू शकता. आपण इंग्रजीतून मराठी sms जसे पाठवतो ना... म्हणजे - माझे नाव राम असे लिहायचे असेल, तर आपण कसे लिहितो - maajhe naava raama. अगदी तसेच येथे फोनेटिकली टाईप करायचे आहे.  

Which link should I add here?

जयमहाराष्ट्रवर तुम्ही तुम्हाला आवडलेली कोणतीही मराठी माहिती, लेख, मराठी गाण्याचे ऑडिओ, व्हिडिओ यांच्या लिंक्स देऊ शकता. फक्त एकच काळजी घ्यायची, शक्यतो कॉपीराईटेड मजकूर, गाणी, व्हिडिओ वगैरे टाळायचे. फक्त एकच काळजी घ्यायची, शक्यतो कॉपीराईटेड मजकूर, गाणी, व्हिडिओ वगैरे टाळायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंक थेटपणे त्या-त्या मजकूराची वा गाणी-व्हिडिओ यांची द्यायची. स‌ाईटच्या होमपेजची लिंक नको. नुसत्या होमपेजची लिंक दिली की मग होतं काय, की लोकांना शोधत बसावं लागतं ना, की तुमचा लेख कुठे आहे वगैरे. तो नाही स‌ापडला, की मग ओमफस! आपल्याला काय हवंय, की मराठी माणसांनी मराठी वाचावं, पाहावं, ऎकावं. तेव्हा थेट लिंक द्यायची आणि स‌गळ्यांचाच वेळ वाचवायचा !

 
 © www.jaymaharashtra.com
Designed & Developed By www.oneupdesigns.com